लॉकडाउन 2.0 विशेष - कोरोनामुक्त या भागांमध्ये २० एप्रिलपासून यांना मिळणार सूट

लॉकडाउन २.०



विषय- - कमी धोका असणाऱ्या व कोरोनामुक्त भागांमध्ये २० एप्रिलपासून यांना' मिळणार सूट

नवी दिल्ली
             केंद्रीय गृह मंत्रालयाने आज बुधवारी लॉकडाउन २.० च्या काळात कमी धोका असणाऱ्या क्षेत्रामध्ये काय सूट मिळेल याबाबत नवी नियमावली जारी केली आहे.

               कोरोनामुक्त भागांमध्ये ही सूट २० एप्रिलपासून लागू असेल. कापणी आणि काही दिवसांवर आलेली पेरणीचा हंगाम लक्षात घेत शेती आणि शेतकऱ्यांशी संबंधित कामांनाही सूट देण्यात आली आहे. मात्र, या दरम्यान सोशल डिस्टंसिंगचे मात्र कठोरपणे पालन केले जाईल. 

               बांधकाम क्षेत्रालाही काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. लॉकडाउनपूर्वी २१ दिवसांप्रमाणेच ३ मेपर्यंत सुरू राहणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातही आरोग्यसेवा सुरू राहणार आहेत._


कृषी आणि पशुपालन उद्योगाला सूट


👉🏻 _शेतीशी संबंधित सर्व कामे सुरूच राहतील, शेतकरी आणि शेतमजुरांना कापणीशी संबंधित कामे करण्याची मुभा दिली जाईल.

👉🏻  _कृषी उपकरणांची दुकाने, त्यांची दुरुस्ती आणि सुट्या भागांची दुकाने खुली राहतील.

👉🏻 _खते, बियाणे, कीटकनाशके तयार करणे आणि त्यांचे वितरण करण्याची कामे सुरूच राहतील, त्यांची दुकाने खुली असतील.

👉🏻 _एका राज्यातून दुसर्‍या राज्यात कापणीशी संबंधी मशीन (कंपाइन) ने-आण करण्यावर बंधन नाही.

👉🏻 _मत्स्यपालनाशी संबंधित उपक्रम, वाहतूक सुरू राहील.

👉🏻 _दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे प्लांट्स आणि त्यांचा पुरवठा सुरू राहील.

👉🏻 _गुरांचे खाद्य आणि उत्पादन, कच्चा माल पुरवठा सुरू राहील.

या उद्योगांना लॉकडाऊन २.० मधून सूट देण्यात आली आहे:


👉🏻 _ग्रामीण भागात कार्यरत उद्योगांना सूट (जे महानगरपालिका किंवा नगरपालिकेच्या अंतर्गत येत नाहीत असे)

👉🏻 _उत्पादन आणि इतर औद्योगिक संस्थांना सूट, विशेष आर्थिक झोनमधील कारखाने आणि औद्योगिक संस्थांना सशर्थ सूट. निर्यात करणाऱ्या संस्थांना सशर्थ सूट. हे उद्योग सुरू होऊ शकतात, परंतु कामगारांना त्यांच्या आवारात राहण्याची व्यवस्था देखील त्यांना करावी लागेल. कामगारांना कामाच्या ठिकाणी आणण्यासाठी मालक जबाबदार असतील आणि या काळात सोशल डिस्टंसिंग पाळावे लागेल.

👉🏻 _औषध, फार्मा, वैद्यकीय उपकरणे आणि कच्च्या मालासह आवश्यक वस्तूंच्या उत्पादनाशी संबंधित युनिटसना सूट.

👉🏻 _फूड प्रोसेसिंग युनिट्सना ग्रामीण भागात काम करण्याची परवानगी.

👉🏻 _आयटी हार्डवेअर उत्पादनांच्या युनिट्सना सूट.

👉🏻 _पॅकेजिंग मटेरियलच्या उत्पादन यूनिट्सना सूट.

👉🏻  _वेगवेगळ्या शिफ्टमध्ये सोशल डिस्टंसिंग पाळत जूट उद्योगाला सूट

👉🏻 _यावेळी ग्रामीण भागात वीटभट्टीला मिळाली सूट

बांधकाम क्षेत्रातील कामांना सूट:


👉🏻 _जेथे गर्दी नसते अशा ठिकाणी रस्ते दुरुस्ती आणि बांधकामास सूट.

👉🏻 _रस्ते बांधकाम, सिंचन प्रकल्प, इमारत बांधकामांना सूट

👉🏻 _ग्रामीण भागातील सर्व प्रकारच्या औद्योगिक प्रकल्पांना (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसह) सूट.

👉🏻 _नूतनीकरणक्षम उर्जा बांधकामास सूट

👉🏻 _शहरी भागातदेखील बांधकामाच्या कामाला सूट. परंतु ही सूट केवळ ज्या ठिकाणी कामगार साइटवर उपलब्ध आहेत, अशा ठिकाणांनाच लागू असेल.

बँकिंग, टपाल सेवा:-


👉🏻 _बँकांच्या शाखा, एटीएम, टपाल सेवा कार्यरत राहतील.

👉🏻 _ऑनलाइन शिकवणी, प्रशिक्षण आणि दूरस्थ शिक्षणास प्रोत्साहन दिले जाईल.


ग्रामीण रोजगारासाठी सूट:-


👉🏻 _सोशल डिस्टंसिंगचे काटेकोरपणे पालन केल्यास मनरेगाच्या कामास परवानगी असेल._

👉🏻 _मनरेगाची कामे सोशल डिस्टंसिंगचे काटेकोर पालन करूनच केली जातील._

👉🏻 _मनरेगामधील सिंचन आणि जलसंधारणाशी संबंधित कामांना प्राधान्य देण्यात येईल._

*आपत्कालीन परिस्थितीत खासगी वाहनांच्या वाहतुकीस परवानगी*

👉🏻 _आपत्कालीन परिस्थितीत, चारचाकी वाहनात चालक सोडून इतर एकच प्रवासी असेल._

👉🏻 _दुचाकीवर केवळ एक व्यक्ती, म्हणजेच चालकासच परवानगी, उल्लंघन केल्यास दंड._

👉🏻 _जर एखादी व्यक्ती क्वारंटाईन केली गेली असतानाही नियमांचे उल्लंघन करत असेल, तिच्यावर आयपीसीच्या कलम १८८ अंतर्गत कारवाई होणार._

👉🏻 _तेल आणि गॅस क्षेत्राचे कामकाज सुरूच राहणार, यासंबंधित वाहतूक, वितरण, साठवण आणि किरकोळ विक्रीशी संबंधित उपक्रम सुरू राहतील._

 वस्तूंच्या वाहतुकीस सूट:


👉🏻 _माल/ मालाची चढ-उतर करणे अशा कामांना सूट._

👉🏻 _पेट्रोलियम आणि एलपीजी उत्पादने, औषधे, खाद्यपदार्थ यासारख्या अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीस परवानगी असेल._

👉🏻 _सर्व ट्रक आणि मालवाहू वाहनांना सूट मिळणार आहे. एका ट्रकमध्ये २ ड्रायव्हर्स आणि एक मदतनीस यांना परवानगी आहे._

👉🏻  _यावेळी ट्रक दुरुस्तीची दुकानांनाही सूट देण्यात आली आहे. ट्रक चालकांना अडचणी येऊ नयेत म्हणून महामार्गही खुले असतील._

👉🏻 _रेल्वे मालवाहतुकीला सूट कायम आहे._

👉🏻 _सर्व आवश्यक वस्तूंसाठी पुरवठा साखळीला परवानगी._

या दुकानांना सूट:


👉🏻 _किराणा दुकाने, रेशन दुकाने, फळे, भाज्या, मांस, मासे, कुक्कुटपालन, धान्य, दुग्धशाळेतील व दुधाचे बूथ, गुरांच्या चाऱ्याच्या दुकानांना सूट._

👉🏻 _प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाला सूट, डीटीएच आणि केबल सेवेलाही सूट._

👉🏻 _आयटीशी संबंधित कंपन्यांना ५० टक्क्यांच्या सामर्थ्याने काम करण्याची परवानगी (हे जोखमेचे क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे क्षेत्र नाही)_

👉🏻 _ई-कॉमर्स कंपन्यांच्या कामाला, त्यांच्या ऑपरेटर्सच्या वाहनांना सूट, मात्र त्यासाठी परवानगी घ्यावी लागणार._

*सरकारी कामाशी संबंधित कॉल सेंटरनाही सूट*

👉🏻 _सरकारी कामाशी संबंधित डेटा आणि कॉल सेंटर सेवा._

👉🏻 _खाजगी सुरक्षा सेवांना परवानगी._

0 टिप्पण्या