मुंबई महानगरपालिका रुग्णालयात वार्डबॉय ची जाहिरात। एकूण पदसंख्या -114

बृहन्मुंबई महानगरपालिका कामगार विभाग 

दिनांक : ०९ . ४ . २०२० जाहिरात 




सूचना- अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : १७.०४.२०२० सायंकाळी ०६ . ०० वाजेपर्यंत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये 'कोव्हीड - १९' या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये 'कोव्हीड - १९' ची बाधा झालेल्या रुग्णांची संख्यादेखील सतत वाढत आहे . त्यामुळे केवळ 'कोव्हीड - १९' ची बाधा झालेल्या रुग्णांची सेवा तसेच यासंदर्भातीलच इतर कामकाज करण्यासाठी कार्यकारी आरोग्य अधिकारी यांच्या अखत्यारितील विशेष रुग्णालयातील रिक्त असलेली 'कक्ष परिचर' ही पदे अर्ज मागवून भरण्यासाठी जाहिरात देण्यात येत आहे . 

सदर पदांचा सामाजिक व समांतर आरक्षण दर्शविणारा तक्ता खालीलप्रमाणे :


संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी प्रूफ सह इथे क्लिक करा

दिव्यांग व्यक्तींसाठी आरक्षित असलेली ४ पदे ही उपरोक्त तक्त्यात समाविष्ट आहेत . तथापि शासन निर्णय क्र . दिव्यांग / २०१८ / प्रक्र ११४ / १६अ दिनांक २९ . ५ . २०१९ मध्ये दिलेल्या निर्देशानुसार पदनिश्चितीची कार्यवाही सुरु आहे . सदर कार्यवाही पूर्ण केल्यानंतर दिव्यांग व्यक्तींसाठी ४ पदे भरण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल . 

तोपर्यंत निःसमर्थ व्यक्तीसाठी आरक्षित ४ पदे खुल्या प्रवर्गातील एकूण रिक्त पदांमधून रिक्त ठेवण्यात येत आहेत . 

शैक्षणिक अर्हता व वेतनश्रेणी : 

शैक्षणीक अर्हता : किमान एस . एस . सी . किंवा तत्सम परीक्षा १०० गुणांच्या मराठी विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . 

वेतनश्रेणी : लेव्हल एन - ९ रु . १८००० / - ते रु . ५६९०० / - + अनुज्ञेय भत्ते .


2 ) वयोमर्यादा , वजन व उंची : 

उमेदवाराचे वय दिनांक ३१ . ३ . २०२० रोजी 

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत - १८ ते ३८ वर्ष 

मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत - १८ ते ४३ वर्षे 
माजी सैनिकांसाठी शासन सेवेतील वर्ग - ३ व वर्ग - ४ मधील पदांसाठी नेमणूकीकरीता विहित वयोमर्यादेतील सुट ही सदर उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक ३ वर्ष इतकी राहील . 

तसेच माजी सैनिकांसाठी शासन सेवेतील वर्ग - ३ व वर्ग - ४ मधील पदांसाठी नेमणूकीकरीता कमाल वयोमर्यादा ४५ वर्षापर्यंत राहील . तसेच शासन निर्णय क्र . निवक - १०१० / प्र . क्र . ०८ / २०१० / १६ - अ दि . ०६ ऑक्टोबर २०१० नुसार 
( अ ) स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य , या घटकातील उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे इतकी राहील . सदर वयोमर्यादा सरसकट शिथिल केलेली असल्याने या घटकातील मागासवर्गीय उमेदवारांसाठी उच्चतम वयोमर्यादा ४५ वर्षे इतकीच राहील . 

शासन निर्णयानुसार खेळाडूंची गुणवत्ता व पात्रता विचारात घेता या पदासाठी असलेली वयोमर्यादा ५ वर्षापर्यंत शिथिल करण्यात येईल . उच्चतम वयोमर्यादा ४३ वर्षे इतकी राहिल . 

केवळ बृहन्मुंबई महागनरपालिकेमधून प्रशिक्षण घेऊन NCTVT उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांसाठी उच्चतम वयोमर्यादा ४५ वर्षे इतकी राहील . 

वजन व उंची 

अ ) पुरुष उमेदवारः किमान वजन ५० कि . ग्रॅ . व उंची १५७ सें . मी . 

ब ) स्त्री उमेदवारः किमान वजन ४५ कि . ग्रॅ . व उंची १५० सें . मी . 

निवडीचे निकष 

१ ) सदर भरती प्रक्रिया ही केवळ कोव्हीड - १९ बाधीत रुग्णांशी संबंधित असलेल्या कामकाजासाठी करण्यात येत आहे . 

२ ) पात्र उमेदवारांची निवडयादी तयार करतांना एस . एस . सी . किंवा तत्सम परीक्षेत सर्व उत्तीर्ण विषयांमध्ये मिळालेल्या एकूण गुणांच्या टक्केवारीनुसार अधिकतम गुणांनुसार ( सामाजिक व समांतर आरक्षणानुसार ) करण्यात येईल . ( बेस्ट ऑफ फाईव्ह ची टक्केवारी विचारात घेतली जाणार नाही ) . 

दोन उमेदवारांना समान गुण असल्यास जो उमेदवार वयाने जेष्ठ आहे त्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल. 

३ )निवड केलेल्या उमेदवारास निवडीच्या दिवसापासून तीन दिवसांच्या आत नोकरीत दाखल होणे आवश्यक राहील . अन्यथा त्याची निवड आपोआप रद्द करण्यात येईल . 

४ ) निवड करण्यात आलेल्या उमेदवाराची निवड ही वैद्यकीय तपासणी , शाळेचा दाखला , चारित्र्य पडताळणी तसेच इतर कागदपत्रे पडताळणीसापेक्ष असल्यामुळे उमेदवार कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरल्यास त्याची निवड रद्द करण्यात येईल . 

८. सर्वसाधारण अटी : 

निवडयादी कोणत्याही वेळी पूर्वसूचना न देता रद्द करण्याचे अधिकार बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तांना आहेत . 

उमेदवाराचा ई - मेल आयडी आणि पत्रव्यवहाराचा पत्ता ( पिन कोड सह ) सुस्पष्ट व पूर्ण असावा . उमेदवार विहित अर्हता व अटी पूर्ण करीत नसल्याचे कोणत्याही क्षणी निदर्शनास आल्यास त्याची उमेदवारी रद्द करण्यात येईल , नेमणूक झाली असल्यास सेवेतून कमी करण्यात येईल व याबाबत कोणताही पत्रव्यवहार विचारात घेतला जाणार नाही . 

इतर राज्यातून महाराष्ट्र राज्यात स्थलांतरीत झालेल्या मागासवर्गीय उमेदवारांचा आरक्षित पदाकरिता विचार केला जाणार नाही . 

उमेदवाराने खालील नमूद केलेल्या शैक्षणिक प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे यांच्या मूळ प्रती तसेच त्यांच्या छायांकित प्रती तपासणीसाठी नियुक्तीपूर्वी सादर करणे आवश्यक आहे . 

अ. उमेदवारांनी शाळा सोडल्याचा दाखला , जन्मदाखला , अधिवास प्रमाणपत्र , शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्र , संबंधित गुणपत्रिका , सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जाती प्रमाणपत्र , जाती वैधतेचे प्रमाणपत्र , उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे नवीनतम प्रमाणपत्र यांच्या मूळप्रती व साक्षांकित छायांकित प्रती . 

ब. विवाहित महिला उमेदवारांनी विवाह नोंदणी प्रमाणपत्र , नावात बदल झाल्याबाबतचे राजपत्र सादर करावे. तसेच ते नसल्यास विवाहित महिला विवाहापूर्वीच्या नावाने अर्ज करु शकतात .

या पदासाठी साक्षणिक पात्रता दहावी पास असून 18 ते 57 हजार इतका पगारही मिळणार आहे . इच्छुक उमेदवारांनी महापालिकेच्या 
                         http:/ /portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावरून अर्जाचा नमुना डाऊनलोड करायचा आहे सर्व नियम आणि अटी वाचल्यानंतर अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF Format मध्ये अर्जासह 
   mcgm.wardboy@mcgm.gov.in या ईमेल आयडीवर पाठवायच्या आहेत . ज्या उमेदवारंना ईमेल करणं शक्य नसल्यास पोस्टाने किंवा महापालिकेच्या मुख्यालयातील गेट क्रमांक 7 या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या बॉक्समध्ये 17 एप्रिल संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पाठवण्याचं आवाहन पालिकेने केलं आहे .


संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी प्रूफ सह इथे क्लिक करा

वरील प्रमाणे माहिती ही मी स्वतः संकलित केली असून आपण एकदा वयक्तिक रित्या खात्री करावी धन्यवाद

0 टिप्पण्या